शिवसेना, मशाल आणि छगन भुजबळ…

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अत्यंत वेगळ्या वळणावर गेला असून उध्दव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण आणि शिवसेना नाव तात्पुरते गोठवल्यामुळे नाव आणि चिन्हाबाबतचे पर्याय निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून मागविले होते. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पर्यायांपैकी आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव आणि “मशाल” हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे.
परंतु शिवसेना व मशाल यांचे नाते आजचे नसून खूप जुने आहे अगदी १९८५ पासून. तर काय आहे शिवसेना मशाल आणि छगन भुजबळ यांचा इतिहास हेच आपण यात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळी त्यांनी 1985 मध्ये माझगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदार म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु त्यावेळी शिवसेनेने जवळ अधिकृत चिन्ह नव्हते. त्यावेळी ते मशाल या चिन्हावर उभे राहून निवडून आले होते. 1985 मध्ये निवडून येणारे छगन भुजबळ हे शिवसेनेचं एकमेक आमदार होते. छगन भुजबळांनी मशाल याच चिन्हावर नगरसेवक म्हणूनही निवडणूक लढवली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 साली महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे ठरविले होते. त्यावेळी सुद्धा मशाल हे चिन्ह मिळाले होते. याच चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून येवून शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली होती.
त्यामुळे आता अंधेरी पोटनिवडणूकिसाठी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळताच सोशल मीडियावर मशाल आणि छगन भुजबळ यांच्या 1985 च्या निवडणूक प्रचाराचे पत्रक (Pamphlet) व्हायरल (Viral) होताना दिसत आहे











