“346 जातींचा नेता एकच- छगन भुजबळ !” बीड ओबीसी एलगार सभेत पडळकरांचा हुंकार

बीड – मराठवाड्याची भूमी ही क्रांतिकारकांची आणि संघर्षाची आहे. संत भगवान बाबा, नवसाजी नाईक, धर्माजी प्रतापराव यासारख्या महापुरुषांनी अन्यायाचा प्रतिकार केला. आता ओबीसी समाजाच्या न्याय हक्कावर गदा येण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ३४६ जातींच्या ओबीसी समाजात एकता आहे,” असा ठाम संदेश भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडच्या ऐतिहासिक ओबीसी एल्गार सभेत दिला.
फूट पाडणाऱ्यांचे डाव उधळणार!
पडळकर म्हणाले, “ओबीसी समाजात मतभेद, फूट पाडण्यासाठी काही राजकीय आणि सामाजिक प्रवृत्ती सक्रिय आहेत. माध्यमांची भूमिका गैरसमज वाढवत आहे. मात्र माधवचा (माळी-धनगर-वंजारी) फॉर्म्युला म्हणजे एकी आणि कृष्णनीती यशस्वी होणार! सरसकट आरक्षण, धनगर आरक्षण, वंजारी व माळी प्रश्न – भांडणं लावून ओबीसी चळवळीचं गणित बिघडवण्याचे डाव आमच्याकडून खपवून घेतले जाणार नाहीत.

आमच ठरलंय ३४६ जातींचा एकच नेता छगन भुजबळ!
आज सर्वांत महत्वाचं म्हणजे ३४६ जातींची एकजूट हेच ओबीसींचं सामर्थ्य आहे आणि आमचं सगळ्यांच ठरलं आमचा एकच नेता छगन भुजबळ. मित्रांनो माधव हा फॉर्मुला आपण मागे बघितला होता. राजकारणामध्ये माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही. सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही, आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे. आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत,
माधवराव – धनगर, माळी, वंजारी, रामोशी, वडार – धनगरांना दुहेरी जबाबदारी
धनगरांना एसटी आरक्षण मिळायलाच हवे, ते आमचं समर्थन आहे. पण ओबीसी आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न कारवाई लागतील त्यासाठी धनगरांना दुहेरी जबाबदारी घ्यावी लागेल. तसेच माधव सोबतच आता माधवराव कारण लागेल म्हणजे माळी, धनगर, वंजारी, रामोशी, वडार यांनाही सोबत घ्यावर लागेल. ओबीसी च्या कोणत्याही घटकावर अन्याय झाल्यास त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण सर्वजण पुढे येऊया.
प्रस्थापितांना इशारा – आम्ही गरीब मराठ्यांच्या विरोधात नाही!
ओबीसी आणि गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो. विविध आरक्षणांसाठी आम्ही बाजूने आहोत. पण प्रस्थापित मराठा समाजाने गरीब ओबीसीचा हक्क हिरावू पाहू नये; तसा प्रयत्न झाला तर आम्ही निर्धाराने विरोध करू.”
ओबीसी आरक्षण वाचवा वाचविण्यासाठी जात पडताळणी समित्यांनी खोटे दाखले देणाऱ्यांवर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे. आपण सर्व भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखालीच पुढे जाऊया असे गोपीचंद पडळकर आपल्या भाषणात म्हणाले.











