आपला जिल्हा

जि. प. कन्या हायस्कूल खामगाव येथे मानसिक आरोग्य जागृती कार्यशाळा संपन्न

खामगाव- दि. २७ | जिल्हा परिषद कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, खामगाव येथे दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मानसिक आरोग्य जागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती खामगावचे गटशिक्षणाधिकारी श्री जी डी गायकवाड तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री बि.डी. खराटे हे होते उपस्थित होते.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व इन्चारा फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी मानसिक आरोग्य जागृती उपक्रम राबविणे सुरु आहे. या उपक्रमाअंतर्गत जि. प. कन्या हायस्कूल, खामगाव येथे दि. २७ ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी उद्घाटनपर मनोगतातून श्री. गायकवाड साहेब यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगीतले. शारीरिक सुदृढतेसोबत मानसिक आरोग्य संतुलित असण्याची खूप आवश्यकता आहे. आपल्या भावना आणि वर्तनातील प्रतिक्रिया यावरून आपले मानसिक आरोग्य कसे आहे ? हे दिसून येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य संतुलित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगीतले. अध्यक्षीय मनोगतातून श्री बि.डी खराटे सर यांनी किशोरावस्था व कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

विद्यालयाचे शिक्षक व मानसिक आरोग्य जागृती जिल्हास्तर मार्गदर्शक, समुपदेशक श्री अरविंद शिंगाडे यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनिंना ‘मानसिक आरोग्य जागृती ‘ विषयक मार्गदर्शन केले . यामध्ये ‘भावनांची ओळख आणि व्यवस्थापन’ या घटकाविषयी माहिती, सादरीकरणातून प्रश्नोत्तरे व विद्यार्थिनिंचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात आला. दैनंदिन जीवनात आनंद, दुःख, आश्चर्य ,राग, तिरस्कार इत्यादी भावना व त्यांचे व्यवस्थापन याविषयी विविध उदाहरणांच्या माध्यमातून तसेच कृतींच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्पष्ट करून सांगीतले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यविषयक समस्या, चिंताविषयक प्रश्न व समुपदेशनाची हेल्पलाईन टोल फ्री नंबर 18001209005 याविषयीसुद्धा माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व इन्चारा फाउंडेशनच्या वतीने सदर उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असून मानसिक आरोग्य जागृतीमध्ये विविध घटकांविषयी वेळोवेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेचे प्रास्ताविक व संचालन श्री. यु. जे. कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन श्री. व्ही. बी. खरात यांनी केलेका. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच इयत्ता ६ वी ते १२ वी च्या २५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button