आपला जिल्हा

जळगाव जामोद मधील भारतीय वायुसेनेतील जवान शहिद

माजी सैनिक दिलीपराव देशमुख व मुख्याध्यापिका सौ रेखाताई दिलीपराव देशमुख रा पेट्रोल पंप मागे वाडी खु , जळगाव जामोद यांचे कनिष्ठ चिरंजीव भारतीय वायुसेना बंगलोर येथिल मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिट मधील कम्युनिकेशन टेक्निशियन या पदावर कार्यरत असलेले स्व. मिथिल दिलीपराव देशमुख हे दि 16/10/2023 रोजी वाजता कर्तव्यावर असतांना शहीद झाले .

दि 16/10/2023 ला सकाळी 5 वाजता कर्तव्य बजावत असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला . त्यानंतर त्यांना वायुदलातील रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्व. मिथिल यांच्यावर उद्या दि 18/10/2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता हिंदू स्मशानभूमी, पेट्रोल पंप माग, वाडी खु जळगाव जामोद येथे पोलीस बंदोबस्तात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्व मिथिल हे भारतीय वायुसेनेत 2011 सालापासून देशसेवा करीत आहे . स्व मिथिल यांच्या पश्चात पत्नी , आई , वडील , भाऊ आदी आप्तेष्ट आहेत .

क्रांतीसुर्य न्यूज कडून शहीद जवान मिथील यांना भावपूर्ण आदरांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button