छत्रपती संभाजीनगर येथे मिठाई वाटप करून मंडल दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर- दि. 08 | पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. १३ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोगाची अंमलबजावणी होऊन ५२% ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे ७ ऑगस्ट हा दिवस देशभरामध्ये मंडल दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये 340 कलम घालून ओबीसींना आरक्षणाची तरतूद करण्यासाठीचा मार्ग खुला केला. याच आधारावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काका कालेलकर आयोग नेमला होता. या आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे पुढे पंतप्रधान मोरार्जी देसाई यांनी मंडल आयोगाची घोषणा केली.
बिहारचे मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे या आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी भारताच्या ४५० जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करून आपला अभ्यासपूर्ण रिपोर्ट १९८० ला सादर केला .या आयोगाच्या शिफारशी तब्बल १० वर्ष धूळखात पडल्या होत्या . त्यानंतर ७ ऑगस्ट १९९० रोजी व्ही. पी. सिंग यांनी हा आयोग लागू करण्याची घोषणा संसदेत केली.
ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व दिसू लागले. ओबीसींना हक्काचे आणि मानाचे स्थान मिळू लागले. ओबीसी समाजावर दुरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मंडल दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने महापुरुषांना अभिवादन आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम ७ ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आला.
औरंगपुरा येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. बी.पी मंडल अमर रहे” विश्वनाथ प्रताप सिंग यांचा विजय असो”, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विजय असो, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विजय असो ‘छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय असो ‘ अश्या घोषणांनी परिसर दुमदुमला. सर्व कार्यकर्त्यांना व सामान्य लोकांना पेढे वाटप करण्यात आले. त्यानंतर भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले प्रा सुदाम चिंचाने ओबीसी समाज अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतो त्याप्रमाणे दरवर्षी 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हा मंडल सप्ताह साजरा केला पाहिजे. तर डॉ कालिदास भांगे यांनी मंडल लढाई च्या विचारांचा अग्नी तेवत ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. सर्व ओबीसी समाजाच्या वतीने महापुरुषांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाची सांगता झाली.[ads1]
याप्रसंगी भारतीय पिछडा ओबीसी संघटन चे विभागीय अध्यक्ष प्रा. सुदाम चिंचाणे ,विभागीय महासचिव डॉ.कालिदास भांगे, महानगर अध्यक्ष डॉ.देवराज दराडे, कोषाध्यक्ष डॉ. वसंत हारकळ, ,डॉ.विलास इप्पर, प्रा राजू पोपळघट, डॉ.जयसिंग सिंघल, डॉ विश्वनाथ कोक्कर, डॉ कृष्णा मालकर, ऍड, नरेंद्र सांगळे , ऍड कृष्णा घुले, श्री निशांत पवार, डॉ. सलगर, डॉ. रमेश जायभाय, डॉ .महालकर आर, डॉ.विश्वनाथ कोक्कर, डॉ.बळी चव्हाण , प्रा.अंकुश राठोड, प्रवीण घुले, नरेंद्र वानखेडे, बजरंग वाकोडे, इत्यादींची उपस्थिती होती











