आपला जिल्हा

शिवमती ज्योतीताई सातव यांची किसान काँग्रेस महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती

खामगाव – दि. 08| काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सातव यांच्या सुनबाई तसेच डॉ. अनंतराव प्रल्हादराव सातव यांच्या पत्नी शिवमती ज्योतीताई अनंतराव सातव यांची आज काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले व किसान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पराग पाष्टे साहेब यांच्या हस्ते किसान काँग्रेस महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सातव यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य पाहून जालना येथील एका कार्यक्रमात सदर नियुक्ती देण्यात आली. यावेळी  ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सातव, मराठवाडा अध्यक्ष एड.राम खुराडे, राज्य उपाध्यक्ष मंगेश भारसाकडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अतुल सिरसाट, डॉ.अनंतराव सातव, मधु बगाडे यांची उपस्थिती होती.

ज्योतीताई सातव यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून यांचे अभिनंदन होत आहे. माळी सेवा मंडळ खामगाव यांच्याकडून यांच्या नियुक्तीबाबत अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button