ओबीसी चे राजकीय अस्तित्व निर्माण करायचे असेल तर मंडल कमिशन आवश्यक आहे- प्रा. श्रावण देवरे

यवतमाळ- दि. 07 | मंडल आयोग लागू होऊन तीस वर्षे झालीत परंतु शंभर टक्के मंडल आयोग लागू झाला नाही .त्यामुळे देशांमध्ये ओबीसी चे राजकीय अस्तित्व तयार झाले नाही. ओबीसीचे राजकीय अस्तित्व तयार करायचे असेल तर मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि त्याकरता भारतामध्ये स्टॅलिन, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, या विचारांची माणसं सातत्याने आता प्रयत्न करत आहेत, त्यांचाच प्रवाह पुढे नेण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी आता निर्माण होत आहे.
या ओबीसी राजकीय आघाडीच्या आखाड्यात आपण उतरून आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि ओबीसीची जात निहाय जनगणना करून घेतली पाहिजे. ही भूमिका मंडल दिनाचे निमित्य साधून महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठांमध्ये झालेल्या व्याख्यानामध्ये प्राध्यापक श्रावण देवरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
देशामध्ये काका कालेलकर आयोग, मंडल आयोग ,नचीपण आयोग ते रोहिणी आयोग याच आपण आता समर्थनच केलं पाहिजे. अशी ही भूमिका त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, अध्यक्ष महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ .तथा भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, विलास काळे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जन मोर्चा, गोविंद चव्हाण, उत्तमराव खंदारे, राहुल पाचघरे, संजय कावलकर ,मनोज पाचघरे, पांडुरंग दीडपाये, विठ्ठल नाकतोडे, वासुदेव खेरडे ,आशिष नरुले, लीना नरुले, शोभा श्रावण देवरे, कमल खंडारे, प्राध्यापक सविताताई हजारे, माधुरी फेडर, 
हरीश कुडे, राजूभाऊ बनारसे, सुभाष वानरे, सुरेश विहीरे, माणिकराव भटकर, रमेश कळसे, रमेशराव खसाळे, श्यामभाऊ वैष्णव, सुनिता काळे, शशिकांत फेडर, मायाताई गोरे, आधी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरी पगारे यांनी मंडल गीत सादर केल. कार्यक्रमाची भूमिका डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी मांडली, विलास काळे यांनी समायोजित विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक सविताताई हजारे यांनी केले.











