महापुरुषांबद्दल अपशब्द काढणाऱ्या मनुवादी भिडे वर तात्काळ कार्यवाही करा – फुले प्रेमींचीं मांगणी

संग्रामपूर – दि. 05 | तालुक्यातील फुले प्रेमींनी आज संग्रामपूर ठाणेदार उलेमाले साहेब तसेच संग्रामपूर तहसीलदार यांना वादग्रस्त विधान करणाऱ्या मनुवादी मनोहर भिडे वर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिले आहे.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी जय भारत मंगल कार्यालय अमरावती येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या बाबत अशोभणिय वक्तव्य केलेले आहे. थोर समाजसुधारकांविषयी वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडविणा-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
भिडे यांनी महात्मा फुले यांचे विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे फुले अनुयायीचा भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अशा वक्तव्यामुळे देशात जातीय तेढ निर्माण होवून अशांतता निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने भिडेचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागनी संग्रामपूर तालुक्यातील फुले प्रेमींच्या वतीने करण्यात आली.
यावेळी हरिभाऊ राजनकर, अनंता मानकर, साहेबराव बोदडे, तुषार सातव, विवेक राऊत, अतुल नारायण वानखडे, श्याम करांगळे, कपिल गायकी, गोपाल घाटे, संतोष वानखडे, विनोद राजनकर, उमेश उमाळे, विशाल उंबरकर उपस्थित होते.