आपला जिल्हा

हार्षि येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न

हार्षी, ता. पैठण (प्रकाश दिलवाले) – दि. 23 | सत्यशोधक समाज सूधारक, थोर विचारवंत शिक्षणाचे प्रणेते बहूजनाचे कैवारी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे जनक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्षि ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.

सदर कार्यक्रमात क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे अ. भा. महात्मा फुले समता परिषद छ. सभाजीनगर जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, छ.संभाजीनगर शहर अध्यक्ष गणेशराव काळे, पैठण तालुका अध्यक्ष देविदास सोणवने, प्रसिद्ध प्रमुख प्रकाश दिलवाले, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा संघटक, भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब भूजबळ, योगेश सोणवने, भरत खोंडे, अमोल रंधे, कारभारी सोनवणे, राजू बोबडे, ई. हस्ते पूजन व पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत शालेय वर्ग सहा ते वर्ग दहा च्या एकूण पंधरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम पारितोषिक शिवानी बाळू सोनटक्के, दूसरे पारितोषिक भक्ती देविदास गिरी तर तीसरे पारितोषिक साक्षी दिलीप वाघ या स्पर्धकांनी प्राप्त केले. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, शिल्ड आणि पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ नवले, आन्नासाहेब जायकर यांनी केले तर विष्णू वाघ, सिताराम वाघ, गोपाल वाघ, अंकुश वाघ, अमोल वाघ, परमेश्वर आगळे, कृष्णा  राऊत, बाळू आगलावे, अंबादास जाधव, दत्ता वाघ, परमेश्वर वाघ, गणेश वाघ, संदिप जायकर, लक्ष्मण सोनटक्के, भास्कर तोगे, अनिल वाघ, ई. खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावातील तरूण मंडळी, जेष्ठ नागरिक, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button