आपला जिल्हा
वाहेगाव साळ येथे सावित्रीमाई फुले स्मृतिदिन संपन्न

वाहेगाव साळ, जि. नाशिक – दि. 14 | सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त वांहेगाव साळ येथील महिलांनी पुढाकार घेऊन सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती हिराबाई किसन खैरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. गावातीलच चिमुकल्या जोया शेख हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनाली होले यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री संदीप पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्विनी खैरे, मेघा मंडलिक, सोसायटी चेअरमन श्री बाजीराव खैरे व ग्रामस्थ निर्मला खैरे, मीना खैरे, शोभा खैरे, रंजना खैरे, ललित खैरे, गणेश मंडलिक, दिलीप खैरे, मनोज खैरे, अजय खैरे, समीर खैरे, दिनेश खैरे, राहुल खैरे यांंच्यासह बहुसंख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.