आपला जिल्हा

जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका रणरागिणींचा महाराष्ट्र विद्युत महामंडळाला आमरण उपोषणाचा” इशारा

दौंड जि. पुणे ( भरत भुजबळ)- दि. 04 | गेल्या अनेक वर्षांपासून ताम्हणे वस्ती, खैरे वस्तीचा काही भाग कभी दाबाने होत असलेल्या विजेमुळे येथील सर्वसामान्य शेतकरी त्रस्त आहेत. ही गोष्ट जिजाऊ ब्रिगेडच्या दौड तालुका अध्यक्षा शिवमती सरिकाताई भुजबळ यांना माहिती पडताच त्यांनी आपल्या सहकारी महिलांसह केडगाव, यवत चे विद्युत वितरण कार्यालय गाठले. महापारेषण च्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन सदर परिस्थिती बाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

सदर निदेनात म्हटले आहे की, सन्माननीय महाराष्ट्र विद्युत महामंडळ शाखा केडगाव/यवत वरील विषयानव्ये आपणास सुचित करण्यात येत आहे की. निळकंठेश्वर डीपी पासून ते खैरे वस्तीवरील देशमुख यांची विहीर असा जवळजवळ २६ पेक्षा अधिक पोलचा लांबचा प्रवास व त्यामध्ये आरथिंगचा तारा गेल्या आठ वर्षापासून पोलवर नसल्यामुळे होणारा वीज पुरवठा हा फार कमी दाबाने होत आहे.

या संबंधित गेल्या आठ वर्षापेक्षा अधिक काळ. विद्युत महामंडळ यवत शाखा यांच्याशी पाठपुरावा करूनही हा भाग दुर्लक्षित ठेवून नाहक सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देण्यात येत आहे असे आमच्या निदर्शनात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या घरातील वीजपुरवठा कमी दाबाने विद्युत पुरवठा चालत असल्याकारणाने घरातील उपकरणे जळणे, टीव्ही, फ्रिज, इतर,व विहिरीवरील मोटारी जळणे, रात्री अप-रात्री वीज जाणे, केबल जळाल्यामुळे पाच पेक्षा जास्त दिवस या भागात वीज पुरवठा खंडित होणे, हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाणे अशा अनेक कारणांमुळे या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

कृपया विद्युत महामंडळाने या भागाकरिता सेपरेट डीपी अथवा काहीतरी पर्याय काढून येथील वीज पुरवठा विद्युत महामंडळ आधीनियमाप्रमाणे देण्यात यावा ही विनंती. अन्यथा, आम्ही जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुक्याच्या रणरागिणी येत्या गुरुवारी विद्युत महामंडळ केडगाव/यवत शाखा येथे आमरण उपोषण हे संविधानिक मार्गाने करू. यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार राहताल याची कृपया नोंद घेण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले. अशी माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुका अध्यक्ष शिवमती सारिकाताई भुजबळ यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button