नाशिक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांचा शाश्वत विकास करण्यावर लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब नेहमी विशेष भर देतात, ह्यालाच नेतृत्व म्हणतात!

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी देण्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कडे मागणी केली आहे. नाशिकचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी भुजबळ साहेबांचा नेहमी पाठपुरावा महाविकास आघाडी सरकार सत्तेत असे पासून चालू होता. या ठिकाणी केवळ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नव्हे तर हे कॅम्पस मेडिकल क्षेत्रातील आगळे वेगळे कॅम्पस असावे असा मानस छगनरावजी भुजबळ साहेब यांचा राहिला आहे. या प्रकल्पासाठी जास्तीची जागा भुजबळ साहेब यांनी मिळवून दिली आहे; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज रुग्णालय, पी.जी इन्स्टिट्यूट सोबतच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, शासकीय युनानी महाविद्यालय, शासकीय फिजिओथेरपी महाविद्यालय आणि या पॅथीशी संलग्न रुग्णालये निर्माण होऊन भविष्यात हा कॅम्पस देशातील वैद्यकीय क्षेत्राची एक वेगळी ओळख निर्माण करेल.
नाशिक जिह्याला भुजबळ साहेब यांच्या विकासकामा मुळे राज्यभर ओळख आहे, नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास महाविकास आघाडी सरकार असताना मंत्री मंडळाची मान्यता मिळाली होती; नाशिक जिल्ह्यात ह्या मान्यते मुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडून येणार आहे, ह्या शिक्षण क्रांतीचा व विकासाचा पाया छगन भुजबळ यांनी रोवला आहे.
जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज नव्हते; वैद्यकिय शिक्षणाचे मुख्य विद्यापीठ एम.यु.एच.एस हे नाशिक येथे आहे पण शासकीय कॉलेज ची कमतरता नेहमी जिह्यात भासत होती, आता ती भुजबळ साहेब यांच्या पाठपुराव्याला मुळे पूर्ण होईल; या अगोदर नाशिक जिल्हा वैद्यकिय क्षेत्रात इतर जिल्हाच्या तुलनेत कमी पडत होता पण भुजबळ साहेब यांच्याचं पाठपुराव्यामुळे हे देखील मोठ्ठं यश नाशिक जिल्ह्यात खेचून आणण्याची किमया भुजबळ साहेब यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्याचा विकास हे ध्येय घेवून सतत कोणत्या न कोणत्या प्रकल्पाचा पाठपुरावा करून तो मंजूर करून घेण्यात भुजबळ साहेब नेहमीच तत्पर असतात, आता शासकीय वैद्यकीय विद्यालयाच्या माध्यमातून पुन्हा नव्याने जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यास भुजबळ साहेब कटीबद्ध आहेत.
आज मितीला शिंदे सरकार मध्ये नाशिक जिह्याचा पालकमंत्री कोण? असा प्रश्न पडला आहे,आढावा बैठक नाही?ओला दुष्काळ?शेतकरी यांचा विजेचा प्रश्न?अशा अनेक समस्या बद्दल एक शब्द ही विद्यमान पालकमंत्री काढत नाही याला पालकमंत्री म्हणतात का?नाही? याला म्हणतात खोकेमंत्री.
विद्यमान पालकमंत्री यांनी खरचं पालकत्व स्वीकारलं आहे का?असा प्रश्न पडतो पण इतकं नक्कीचं वाटते की जिल्हा आज हतबल आहे जबाबदार पालकत्व नसल्यामुळे!जिल्ह्याला कार्यसम्राट पालकमंत्री न मिळाल्या मुळे जिल्हाची मोठी हानी होत आहे,विद्यमान पालकमंत्री यांनी गेल्या काही दिवसात जिह्यासाठी कोणते निर्णय घेतले?घेतले असेल तर सांगा जनतेलाही समजेल, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल कोणताच विषय घेतला जात नाही ही शिंदे सरकार ची शोकांतिका वाटते.[ads1]
नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे १५१ व्या वर्षात शासनाने दिलेली अभूतपूर्व भेट आहे, पदव्युत्तर अभ्यासक्रम तात्काळ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महाविकास आघाडी चे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दिला आहे.[ads2]
नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास मंत्री मंडळ बैठकीत महाविकास आघाडी सरकार असताना मान्यता दिली होती, ही मान्यता म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या १५१ व्या वर्षात राज्य शासनाने जिल्हावासीयांना दिलेली एक अभूतपूर्व अशी भेट असून त्याच बरोबर ती एक मोठी उपलब्धि आहे; येत्या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना माजी मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दिल्या आहेत.
आदरणीय भुजबळ साहेब,आपल्या माध्यमातून आपल्याच पाठपुराव्यामुळे नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं राहतय याचा नक्कीचं अभिमान वाटतोय ! [author title=”डॉ. कमलेश पैठणकर” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/IMG-20220601-WA0075.jpg”]भुजबळ समर्थक[/author]





