जि प आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे शिक्षण दिन साजरा

कळंब/ धाराशिव – दि. 11 | तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री संतोष भोजने यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहशिक्षक श्री. हनुमंत घाडगे यांनी डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. स्वतंत्र भारतापुढील आव्हाने आणि इथली शिक्षण व्यवस्था सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्याचे अवघड काम त्याकाळी मौलाना आझाद यांनी केले असल्याचे प्रतिपादित केले.
आजच्याच दिवशी शाळेतील विद्यार्थीनी कु अंजली शहाजी लोमटे आणि स्वप्नाली संतोष रसाळ यांचा वाढदिवस असल्याने तोही साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षिका श्रीमती भारती सुर्यवंशी मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती समिना बागवान मॅडम यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.











