माळी समाज राज्यस्तरिय युवक युवती परिचय महासम्मेलनाच्या कार्याध्यक्ष पदी अजय तायडे यांची निवड
खामगाव – दि. 25 | माळी सेवा मंडळ खामगाव व युगपुरुष महात्मा फुले प्रतिष्ठाण अकोला यांचे सयुक्त विद्यमाने गेल्या २९ वर्षापासुन संत नगरी शेगाव येथे उपवर युवक युवती परिचय संम्मेलनाचे आयोजन केल्या जाते .
या परिचय संम्मेलनामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश , छत्तीसगढ , दिल्ली , गुजरात सह नौकरी निमीत्ताने परदेशात गेलेल्या समाज बांधवांचा मोठा सहभाग असतो .
जानेवारी २०२३ मध्ये संपन्न होणार्या २९ व्या संमेलनाच्या आयोजना संदर्भात माळी भवन खामगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे परिचय सम्मेलनाचे अध्यक्ष पदी हिवरखेड ता. तेल्हारा येथील सुरेशभाऊ गिर्हे यांची तर कार्याध्यक्ष पदी अजय काशिरामजी तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आ. क्रुष्णरावजी इंगळे होते तर प्रमुख उपस्थिती माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादराव बगाडे, महात्मा फुले प्रतिष्ठाण अकोलाचे अध्यक्ष प्रा. दिनेश तायडे यांचे सह सुकाणु समितीचे सदस्य सर्वश्री, धोंडीरामजी खंडारे, डाँ नामदेवराव तानकर, तुकारामजी निखाडे, आँ शंकरराव वानखडे, रामेश्वरराव वावगे, बाळासाहेब बगाडे, नामदेवराव बहादरे, सदानंद खंडारे, श्रिक्रुष्ण बोळे, संजय वानखडे, राजेंद्र बोचरे, सुभाषराव निखाडे, प्रल्हादराव सातव, रघुनाथ चोपडे, गजाननभाऊ राऊत, विजयराव वावगे
याचेसह प्रा. हरिभाऊ इंगळे, माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदिप सातव, विनायक जुमडे, श्रिक्रुष्ण खंडारे, विकासराव बगाडे, डाँ भास्करराव चरखे, खरेदी विक्री संस्थेचे संचालक पांडुरंग राखोंडे, राजेंद्र धनोकार, विलास क्षिरसागर, अरविंद शिंगाडे, समाधान बगाडे, प्रविण माळी, विजय राखोंडे, शरदराव गायकी, रामभाऊ बोचरे, अनिल गिर्हे, राजेश तायडे, पंकज सातव, विठ्ठल ढगे, संजय तायडे, अनंत सातव, उल्हास क्षिरसागर, प्रमोदभाऊ सातव अनिलभाऊ वानखडे, गजेंद्र गायकी, नंदुभाऊ सातव, अरविंद बोचरे, सदाशीवराव राऊत, रामेश्वर बंड, जयेश वावगे, दत्ताभाऊ जावळकर, अभिषेक निखाडे, विजय इंगळे, कैलास बगाडे, संतोष वानखडे सर, श्रिधर राखोंडे, एकनाथ इंगळे, विवेक निमकर्डे, अशोक उगले, अशोक बगाडे, श्रिकांत गिर्हे, गणेश खिरोडकर यांचेसह अकोला, वाशीम बुलडाणा जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप सातव यांनी तर आभार विजय राखोंडे यांनी मानले .