मोरया प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना दिला आधार— अमृतराज माने देशमुख
वेळापूर – दि – 02 | मोरया प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना आधार देण्याचे मोठे काम केले असल्याचे प्रतिपादन महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख यांनी अध्यक्षस्थानावरुन केले ते वेळापूर मेहत्रे मळा येथील श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणुन ॲड. दत्तात्रय आडत हे होते.[ads1]
प्रारंभी दीप प्रज्वलन महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष व माजी उपसरपंच शंकरराव काकूळे, ॲड. दत्तात्रेय आडत, सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे, सावता म्हेत्रे, पत्रकार महादेव जाधव, ॲड. पांडुरंग लांडे महाराज, विजय एकतपुरे, सीमाताई एकतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विजय एकतपुरे, ॲड.बी एस गोरवे, ॲड. एस डी झंजे, . बी आर पाटील, ॲड.पी पी फडतरे ,ॲड. प्रशांत बिचकुले, महादेव बनकर, दीपक राऊत, रुद्रतेज अमरसिंह माने देशमुख, गणेश आडत, अमोल एकतपुरे, फुलचंद वेदपाठक, अभिजीत फुले आदी. मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा मोरया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रामचंद्र ताटे, महादेवभाऊ ताटे, सावता मेहत्रे, माऊली म्हेञे, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजभूषण पुरस्कार दैनिक सुराज्याचे पत्रकार महादेव जाधव, ह भ प ॲड. पांडुरंग नानासो लांडे महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षा सीमाताई एकतपुरे यांना महादेव देवालय ट्रस्ट अध्यक्ष अमृतराज माने देशमुख व शंकरराव काकूळे, ॲड. दत्ताञेय आडत यांच्या हस्ते फेटा बांधून शाल घालून सन्मान चिन्ह देऊन प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला मोरया प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आकाश म्हेत्रे, सचिव संतोष म्हेत्रे, सहसचिव निलेश म्हेत्रे, खजिनदार गणेश म्हेत्रे, कार्याध्यक्ष कल्याण भानवसे, आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, तसेच डाॅ. धनंजय म्हेञे, ग्रामस्थ, महिलावर्ग, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार ॲड. रामचंद्र ताटे यांनी मानले.