जिल्हाधिकारी यांचे हस्ते कु .अवंती शिंगाडेचा सत्कार
बुलडाणा – दि. १५ | पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत सोळावा क्रमांक व बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु . अवंती अरविंद शिंगाडे हिचा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात मा. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .[ads1]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. यावेळी मा. संजय गायकवाड (आमदार बुलडाणा), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. भाग्यश्री विसपुते जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अरविंद चावरिया, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा . किशोर पागोरे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा . प्रकाश मुकुंद, जिल्हा क्रीडा अधिकारी मा . गणेश जाधव, तसेच अवांतीचे वडील अरविंद शिंगाडे, आई सौ. वैशाली शिंगाडे यांची उपस्थिती होती. कु . अवंतीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.