आपला जिल्हा

नरेन्द्र वानखडे यांची सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भेट

नायगाव, जि. सातारा – दि. 17 | महाराष्ट्र माळी समाज कर्मचारी महासंघ प्रदेश अध्यक्ष नरेंद्र यशोदा मधुकरराव वानखडे यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले स्मारक नायगाव जि सातारा येथे भेट देऊन सावित्रीबाई व महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन केले.

सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी, त्यांचे जन्मस्थळ घर यांची पाहणी केली. नायगाव येथे जाण्याचे खूप समाधान वाटले व नवीन ऊर्जा मिळाली. गावातील ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ नेवसे व तरुण नवयुवक यांच्यासह ग्रामस्थासोबत संवाद साधला.गावाची पाहणी करून प्रत्येक घरावर पती,पत्नी दोघांच्या नावाच्या पाट्या पाहून खूप समाधान वाटले.खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता असल्याचे जाणवले. – नरेंद्र वानखडे ( प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र माळी समाज कर्मचारी महासंघ)

त्यावेळी त्यांच्यासोबत माळी समाज परिचय महासंमेलन चे माजी अध्यक्ष तुकाराम निखाडे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button