आपला जिल्हा
ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र तर्फे समर्पित ओबीसी आयोगाला निवेदन सादर
अमरावती -दि. 28 | महाराष्ट्र शासनाने मा श्री.जयंत कुमार बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समर्पित आयोगाने ओबीसींच्या इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी अमरावती विभागातील ओबीसींच्या सूचना व निवेदने स्विकारण्यासाठी दि.28 मे,२०२२ रोजी सुनावणी आयोजित केली होती. त्याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष मा.श्री.जयंत कुमार बांठीया यांना भारतीय पिछडा ओबीसी शोषित सघटन दिल्ली व ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने निवेदन देताना प्रविण पेटकर, गणेशराव मानकर, रुपेश फसाटे इ.उपस्थित होते