राष्ट्रीय ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन
कळंब- दि. 11 | राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने थोर समाजसुधारक,शिक्षण तज्ञ, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 195 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कळंब शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने यांच्या नेतृत्वात हा जयंती उत्सव पार पडला. यावेळी मंगरूळ जि प गटाचे सदस्य सुरेश तात्या कोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी टी जी माळी साहेब, श्री ज्ञानेश्वर तोडकर सर श्री तानाजी माळी सर,प्राध्यापक गोंदकर सर, प्रतिष्ठित व्यापारी सतीश खिंवसरा, श्री प्रशांत पोते सर,नगरसेवक शैलेश शिंदे,श्री हरी पांचाळ सर, श्री सूर्यकांत वाघमारे,सिध्देश्वर सातव,श्री.राऊत सर,सावंत सर,शिंदे सर,प्रभात केसरीचे प्रतिनीधी प्रदीप यादव,बन सर,सचिन ताकपिरे सर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.