आपला जिल्हा

ओबिसींना शक्ती देऊ -मा. आमदार राहुल बोंद्रे

चिखली येथे जिल्हास्तरीय काँग्रेस ओबीसी विभागाची आढावा बैठक संपन्न

चिखली/बुलढाणा – दि. 01 | बुलढाणा जिल्हा काँग्रेस ओबिसी विभागाची ची आढावा बैठक चिखली येथे बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा.आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांचे अध्यक्षते मध्ये संपन्न झाली. सदर बैठकीस जिल्हा प्रभारी व ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.विजय अण्णा राऊत,सहप्रभारी अशाेकराव खलाणे यांची विशेष उपस्थीती होती. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मा.राजिव घुटे, संजय पाखरे प्रदेशचे महासचिव निसार चौधरी, भागवत वानेरे, संजय किनगे, प्रदेश सचिव अजय तायडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन खरात, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष मा.दिपक देशमाने, क्रु उ बा समीतीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडतकर, समाधानजी सुपेकर, सचिनभाऊ बोंद्रे, काँग्रेस सोशल मीडिया चे राज्य समन्वयक श्लोकानंद डांगे यांची उपस्थिती हाेती .

यावेळी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना राहुलभाऊ बोंद्रे यांनी उपरोक्त विधान केले. ओबिसी हा समाजाचा मोठा घटक असुन देशाच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ओबिसींच्या आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी त्यांच्या पाठिशी शक्ती ऊभी करु व ओबिसींना राजकिय, शैक्षणिक क्षेत्रात सहभाग राहण्यासाठी प्रयत्न करु असे विधान त्यांनी केले.

यावेळी जिल्हा प्रभारी विजयजी राऊत, सहप्रभारी अशोकराव खलाणे यांनी सांगितले की ओबिसींचे आरक्षण वाचविण्यासाठी संघटण महत्वाचे आहे, सर्वांनी एकत्र येऊन ओबिसींच्या प्रश्नासाठी लढा उभारला पाहीजे. त्याच प्रमाणे पनवेल येथे आयोजित केलेल्या ओबिसींच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी व ओबिसींच्या विविध मागण्या संदर्भात आयोजीत केलेल्या मोर्चामध्ये मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन केले.

यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस ओबिसी विभागाची कार्यकारणी तसेच तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी समाधान दामधर, महेंद्र बोडखे, अशोक इंगळे, शंकर बोदवडे यांचे सह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे, तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रा. गजानन खरात यांनी केले व संजय किनगे यांनी आभार मानले. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button