आपला जिल्हा
शिष्यवृत्ती परीक्षेत कु . अवंती अरविंद शिंगाडे विदर्भातून प्रथम
खामगाव – दि.10 | स्थानिक सरस्वती विद्या मंदीर खामगावची विद्यार्थिनी कु. अवंती अरविंद शिंगाडे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( इयत्ता ८ वी ) विदर्भातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कु. अवंतीने प्राप्त केलेल्या गुणांची टक्केवारी ८९.२६ इतकी असून तिने महाराष्ट्र राज्याच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ( शहरी ) १६ वे स्थान मिळविले आहे . तसेच ती बुलडाणा जिल्ह्यातूनही प्रथम क्रमांकावर आहे.
कु. अवंतीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, डिझायर कोचींग क्लासचे श्री. डी. पी. दांडगे सर यांचेसह तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दिले आहे. कु. अवंती ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक अरविंद शिंगाडे यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.