साकोरा येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न
भारतातील मूळ रहिवासी हे निसर्गपूजक -सत्यशोधक अरविंद खैरणार औरंगाबाद
साकोरा, ता- नांदगाव, जि. नाशिक | दि. 07 | येथील बबनराव सुखदेव सुरसे यांच्या पत्नी व प्रबोधनकार प्रा. रविंद्र बबनराव सुरोशे यांच्या मातोश्री नामे सौ. इंदुबाई बबनराव सुरोशे यांचे बुधवार दिनांक. २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२:२० मिनिटांनी वयाच्या ७५ व्या वर्षी निसर्गात विलीन झाले. त्यांचा सत्यशोधक दशक्रिया विधी आज दिनांक शुक्रवार ७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता कपिलेश्वर महादेव मंदिर साकोरा याठिकाणी सत्यशोधक विधी कर्ते सत्यशोधक भगवान रोकडे व सत्यशोधक विलास माळी (चाळीसगाव ) यांनी सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया संपन्न केला. या दशक्रिया विधी मध्ये कुठलेही कर्मकांड किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता सत्यशोधक पद्धतीने संपूर्ण विधी पार संपन्न झाला.
निसर्गवाशी इंदुबाई बबनराव सुरसे यांच्या आठवण म्हणून परिसरात दहा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी राज्य सत्यशोधक परिषदेचे प्रचारक सत्यशोधक अरविंद खैरनार यांनी सत्यशोधक समाजाची माहीती देऊन आपले मनोगत व्यक्त केले तसेच लवकरच गावोगावी सत्यशोधक विधिकर्ते तयार करण्याचे प्रशिक्षण लवकरच सुरु करणार आहोत याबाबत माहिती दिली. आपल्या परिसरात निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी वृक्ष रोपण करण्यात आले.
प्रसंगी उपस्थित जनसमुदायाने सत्यशोधक पद्धतीनेच विवाह, अंत्यविधी, दशक्रिया विधी तसेच वास्तू /गृहप्रवेश करू असा विश्वास व्यक्त केला व सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी केल्यामुळे सुरोशे परिवाराचे सर्वांनी कौतुक केले.











