जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव बु येथे गुंज संस्थे तर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप
बोरगाव- दि. 06 | गुंज संस्था गेल्या 23 वर्षापासून आपण समाजाचे कांहीं तरी देणे लागतो या हेतूने ही संस्था कार्य करत आहे. आज या संस्थेतर्फे सर्वप्रथम निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कविता गायन, नाटिका इत्यादी कार्यक्रम घेऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व खेळाचे साहित्य वाटप मा. श्री अजित कांकरिया (मराठवाडा समन्वयक गुंज संस्था) व दत्तात्रेय पाटील – ठाणे यांनी शाळेत येऊन सर्व विद्यार्थी संखयेनुसार 132 विद्यार्थ्यांना स्कूल किट च्यामध्ये (स्कूल बॅग , 4 रजिस्टर, पेन्सिल, डिक्शनरी, कंपास)चे वाटप व खेळाचे साहित्य वाटप केले.
शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री. उकिरडे सर यांनी मा. अजित कांकरिया व श्री. दत्तात्रेय पाटील सरांचा सत्कार केला. यावेळी सरपंच श्री. सुभाष रणदिवे, शिक्षण तज्ञ श्री. मनोज माळी , ग्रा प सदस्य श्री. जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पाखरे सर यांनी केले व श्री समुद्रे सर यांनी आभार मानले. आज स्कूल किट पाहून विदयार्थी यांच्या चेहऱ्यावचा आनंद शब्दात व्यक्त न करण्यासारखा आहे











