आपला जिल्हा

कर्मकांडात न गुंतता प्रगती करा – डॉ. स्मिता मेहेत्रे

मूल: चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तालुक्यात चिमढा येथे ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीआई फुले जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन दर्शन करतांना महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनकार, साहित्यिक, कवयित्री, सामाजिक व सत्य शोधक विचारवंत, मा.डाॅ.स्मिता निशिकांत मेहेत्रे म्हणाल्या, सावित्रीआई फुलेंमुळे आज स्त्रीया रिक्षा ते अंतरीक्षा पर्यंत पोहचल्या आहेत. आपला समाज सावित्री आई फुले महात्मा फुले यांचा ऋणी आहे.त्यांच्या विचार अंगी बाळगण्याचा प्रयत्न करून आपली वाटचाल प्रगती कडे करा. कर्मकांड, अंधश्रद्धात गुरफटून राहू नका. तरूण तरूणींनो आई-वडीलांची,सासु-सासर्यांची सेवा करा. विद्यार्थांनो खुप अभ्यास करून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करा.

याप्रसंगी मंचावर उपस्थित, कार्यक्रमाचे उदघाटक, मा.गुरूदास चौधरी सर , जिल्हा सरचिटणीस अ .भा.माळी महासंघ चंद्रपुर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा.प्रा. विजय लोनबले सर, अध्यक्ष अखिल भा. म.फूले समता परिषद जिल्हा चंद्रपुर, मार्गदर्शक, मा. बळीराम निकोडे सर,माळी समाज सेवा संघ अध्यक्ष जिल्हा चंद्रपुर,सामाजिक विचार वंत, मा.निशिकांत मेहेत्रे सर नागपूर, चिमढा येथील सरपंच, मा. कालिदास खोबरागडे, मा.ईश्वर लोनबले सर, मा.नंदू बारस्कर सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गजानन चौधरी माजी सरपंच चिमढा तर संचालन वैभव लोनबले यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील, तसेच आसपासच्या गावातील महिला, पूरूष तसेच विद्यार्थी, श्रोता गण मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमात महीला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या हे विशेष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button