आपला जिल्हा

३ ते १२ जाने.’सावित्री जिजाऊ दश रात्रौत्सव: प्रा. हरी नरके

२००६ साली अकोला येथील एका परिषदेत मी ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती.ती डॉ. आ.हा साळुंखे सरांनी जोरदारपणे उचलून धरली.तेव्हा सन्मित्र संजय आवटे अकोला लोकमतचे संपादक होते, त्यांनी या कल्पनेने स्वागत करून त्याला मोठी प्रसिद्धी दिली. परिणामी ३ जानेवारी २००७ रोजी जिजाऊंच्या जन्मभूमीत सिंदखेड राजाला माझ्याच हस्ते ह्या उपक्रमाची सुरुवात झाली. लोकांना पुरोगामी व उपक्रमशील पर्याय दिले तर ते रुजतात,मोठे होतात. सनातनी वर्ग बहुजन समाजाला वैदिक धर्माच्या कर्मकांडात २४×३६५ दिवस अडकवून ठेवतो. विषमतावादी प्रतीकं आणि रूढी परंपरांमध्ये गुंतवून ठेवतो आणि त्याच्या मुक्तीदात्या महापुरुषांच्या विचारांपासून दूर ठेवतो. अशा वेळी धार्मिक अस्मिता आणि धार्मिक पर्यटन यातून बहुजनांना समतावादी विचारांकडे वळवावे लागेल. चिवटपणे, चिकाटीने, सातत्याने गोष्टी लावून धरल्या तरच त्या टिकतात, रुजून मोठ्या होतात. याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा आला. काल शिक्षण खात्याने हा उपक्रम सर्व शाळांमध्ये करण्याचा शासनादेश काढला ही आनंदाची बाब होय.सर्व पुरोगामी शिक्षक- शिक्षिकांनी हा उपक्रम मोठा करायला हवा. महाविकास आघाडी सरकार व विशेषतः शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे अभिनंदन – प्रा.हरी नरके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button