आपला जिल्हा

डॉ. उमेश नावाडे (नागपूर) व डॉ. सुधाकर सवडनकर (बुलडाणा) याना स्व. डॉ. अरुण खासबागे मानव सेवा पुरस्कार जाहीर

बुलडाणा – दि. 18 | सन 2014-15 पासून स्व. डॉ. अरुण खासबागे स्मृती प्रतिष्ठान बुलडाणा च्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव जपून रुग्ण सेवा करणारया डॉक्टरांना डॉ. अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची प्रेरणा समाजाला व डॉक्टरांना मिळावी तसेच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हा संदेश रूढ व्हावा यासाठी स्व. डॉ. खासबागे स्मृती प्रतिष्ठान दरवर्षी 8 जानेवारी रोजी डॉ. खासबागे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार वितरित करते. डॉक्टरांनी केलेल्या प्रयोग सेवेचा सन्मान हा या मागचा मूळ हेतू असून सादर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ असून मान्यवरांच्या उपस्तिथीत पुरस्कार वितरित करण्यात येईल.

तीन दशकाहून अधिक काळ काम करणारे डॉ. सुधाकर सवडतकर एम. डी. (मेडिसिन) व दोन दशकाहून अधिक काळ बालरोग तज्ञ म्हणून सेवा देणारे डॉ. उमेश नावाडे नागपूर एम. डी. यांना प्रसिध्द विधी तज्ञ मा. अँड गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मा. डॉ. संदेश राठोड मा.डॉ. सचिन झगडे आणि मा अँड विजय सावळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कोविड 19 चा प्राधुरभाव लक्षात घेता मोजक्या निमंत्रित मान्यवरांच्या उपस्तिथीत हा पुरस्कार वितरण सोहळा बुलडाणा जिमखाना क्लब येथील सभागृहात साजरा करण्यात येणार आहे असे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button