आपला जिल्हा

यवतमाळ येथे माळी समाज उपवर वधुवर परिचय मेळावासंपन्न

यवतमाळ दि. 15 | दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी यवतमाळच्या हृदयस्थानी असलेल्या टिंबर भवन येथे माळी समाज बहुउद्देशिय संस्था महाराष्ट्र व यवतमाळ च्या वतीने १० वा राज्यस्तरीय सर्व शाखीय उपवर वधु परिचय व पालक परिचय मेळावा व फुलमाळ पुस्तक प्रकाशन चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटणकर होते. तर उद्घाटक व विमोचक प्रदेश अध्यक्ष अॅड. श्रीकांत नागरीकर, विठ्ठलराव बनकर, डॉ. राजेंद्र आंडे, अरुणराव तिखे, डॉ. रामदास महाजन, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, पोलीस अधिक्षक यवतमाळ दिलीपराव भुजबळ पाटील, कैलास जामगडे, गोविंद वैराळे, संतोष गोटेफोडे, श्याम गोटेफोडे, धन्नालाल नागरीकर, पुरुषोत्तम नागरीकर, राधेश्याम आमकर, यशवंत उपरीकर, विनोद राउत, सौ. मंजुषा महाजन, सौ. जया खर्डेकर, सुरेश शिरसाट, राजुडोंगरे, प्रा. काशिनाथ लाहोरे गिरीष बेले, विठ्ठलराव उके, प्रमोद लांजेवार, गणेश मानकर विमोचक म्हणून नाना आमले, स्वागताध्यक्ष आत्मराम जाधव होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत सावतामाळी, महात्मा फुले, सावित्री फुले च्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत समिती द्वारे करण्यात आले. त्यावेळी स्वागत गित गायन करण्यात आले. तसेच कु. शाश्वनी ज्ञानेश्वर मेशराम हिने कथक नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. ज्ञानेश्वर गोरे व प्रदेश प्रवक्ता सावता परिषद नानासाहेब आमले यांचे मनोगत घेण्यात आले. व उपवर युवक व युवती परिचय व पालक परिचय घेण्यात आला. परिचया करीता यवतमाळ अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली येथुन मोठ्या संख्येने पालक युवक युवती समाज बांधव हजर होते. परीचय देणाऱ्याला फुलमाळ पुस्तक मोफत देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रवि नागरीक, सौ. पुजा राउत, सौ. कविता चिचमलकर यांनी. व अध्यक्षीय भाषण व समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button