श्री.संत सावता माळी सेवा मंडळ आळंदी देवाची येथे बैठक संपन्न
आळंदी- पुणे- रविवार. दि.५/१२/२०२१.रोजी आळंदी देवाची येथे महात्मा जोतिबा फुले यांची १३१ वी पुण्यतिथीचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र गोरे यांच्या हस्ते व सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमा निमित्त थोर विचारवंत प्रा.श्री.अनिलजी नरके सर.यांचे महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंडळाच्या विनंतीला मान देऊन प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. मनोजजी गुंजाळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून आळंदी देवाची येथे मंडळाच्या माध्यमातून व लोकसहभागातून श्री.संत सावता महाराज यांच्या मंदिर उभारणीच्या कार्यासाठी श्री.अमृतराव काळोखे. सातारा (पुणे),म निषा ताई राऊत.(सांगली), श्री.संजय बाबा करपे.(सातारा), किरणजी भुजबळ.(सातारा), श्री.आनंदा कुदळे.(पिंपरी), श्री.निलेशजी रसाळ(नगरपारनेर) श्री.सुभाष महाराज उमरीकर. (परभणी), श्री.आबासाहेब भोंगळे.(सासवड), श्री. एखतपुरे साहेब.(अकलूज), श्री.गोविंदराव आल्हाट.(मोशी), स्वप्नाताई लोणकर.(बारामती), सिमाताई पांढरे.(बारामती), श्री.दादासो विधाटे.(बारामती), श्री. संतोषजी बोराटे.(बारामती)
कविता ताई जकाते.(तळेगाव), मंगलताई सासवडे.(शिक्रापूर), भाग्यश्री ताई जाधव.(शिक्रापूर), सिमाताई गायकवाड.(शिक्रापूर) इ.मान्यवरांनी आपल्या विचारांचे अतिशय छान मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा.सौ.वेशालीताई सिनलकर यांना सावित्रीची लेक म्हणून गौरविण्यात आले.तसेच समता परीषद चे सम्मनवयक नाशिक चे अनिल नाळे फोन वरुन संपर्क कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या पुढील मिटिंगा उपस्थित राहील असे सागितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी जकाते व प्रास्ताविक श्री.चंद्रशेखरजी परंडवाल यांनी केले.मंडळाचे शैक्षणिक व सांस्कृतिक विभाग प्रमुख. प्रा.जालिंदर पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अतिशय छान कौटुंबिक पध्दतीने संपन्न झाला.
श्री.संत सावता माळी सेवा मंडळ आळंदी देवाची.यांच्या वतीने आयोजित महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या आमंत्रणाचा मान ठेवून महाराष्ट्रतून आलेल्या सर्वच सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून आत्मियतेने उपस्थित राहिलात व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे मनापासून खूप खूप आभार व धन्यवाद.