सामाजिक सत्कार आणि वैचारिक बैठक संपन्न
सुटाळा, खामगाव- दि. 27| सुटाळा ता खामगाव येथील सरपंच श्रीकांतभाऊ वानखडे यांच्या सरपंच कार्यकिर्दीच्या यशस्वी वाटचालीकरता माळी समाज बांधवांकडून सावता महाराज यांचा फोटो देऊन सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग सचिव पदी अजय भाऊ तायडे तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला-बुलढाणा विभाग अध्यक्ष पदी पथप्रदीप चे संपादक योगेश भाऊ हजारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार समारंभ पार पडला.
सदर बैठकीत विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली. प्रदीप भाऊ सातव, अजयभाऊ तायडे, संतोष निलखन सर, दत्ताभाऊ जावळकर, श्रीकांतभाऊ वानखडे, जयेशभाऊ वावगे, प्रविण बोचरे यांनी आपले मत व्यक्त करीत बैठकीला मार्गदर्शन केले.
या बैठकीला माळी मंडळ खामगाव चे अध्यक्ष प्रल्हादभाऊ बगाडे, सचिव प्रदीपजी सातव, काँग्रेस ओबीसी विभाग सचिव अजय भाऊ तायडे, सुटाळा बु. सरपंच श्रीकांत भाऊ वानखडे, महाराष्ट्र माळी समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रजी वानखडे, महाराष्ट्र माळी समाज कर्मचारी महासंघ प्रदेश सचिव संतोषजी निलखन, सुटाळा खुर्द चे उपसरपंच जयेशभाऊ वावगे, दत्ताभाऊ जावळकर, पथप्रदीपचे संपादक योगेश हजारे, मा. नगरसेवक खामगाव विजय भाऊ उगले, नगर परिषद खामगाव इंजिनियर रविभाऊ पारस्कर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भाऊ भोपळे
श्री साई अकॅडमीचे संचालक श्रीकांतजी बेलसरे, क्रांतीसुर्य न्यूज पोर्टल चे संपादक प्रविण बोचरे, उल्हासभाऊ क्षिरसागर, अजयभाऊ धनोकार, डॉ. श्याम देवकर सर, डॉ. किशोर वानखेडे सर, गोपालभाऊ सातव, प्रदीपभाऊ मोठे, केशवभाऊ इंगळे, सुदामभाऊ इंगळे, गणेश खिरोडकर, गोपाल राऊत, आकाश वानखडे, सुरज भोपळे, निलेश वावगे, प्रशांत बनकर, आकाश सातव, धीरज मानकर, पंकज सातव इत्यादी परिसरातील समाज बांधव उपस्थित होते