आपला जिल्हा

१४वे अ.भा. महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ.स्मिता मेहेत्रे यांची निवड

नागपूर – दि.20 | १४ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित हे संमेलन दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूरात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. प्रा. पंडीतराव लोहोकरे, निमंत्रक मा. अनिल अनभूले, राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद गोरे, उपाध्यक्ष मा. शुभांगीताई काळभोर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.फुलचंद नागटिळक, प्रदेश संघटक, मा. अमोल कुंभार, आदी उपस्थित राहणार आहे. डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे या नागपूरकर ते सोलापूरकर असा स्नेहभाव साहित्य संमेलनाच्या निमित्तान जुळवून आणित आहे.

स्मिता निशिकांत मेहेत्रे अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रगती मानकर, प्राप्तीताई माने, डॉ. माधुरी सपाटे, अॅड. नितीन देशमुख, रजनी राणेकर, अॅड. रोमा खंडवाणी, मिलींद फुलझेले, संध्याताई राजूरकर, डॉ. विणा राऊत, विलास गजभिये, बलदेव आडे, महेश भामरे, राजेश चिकाटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button