आपला जिल्हा

जय बाबाजी फाऊंडेशन च्या मदतीने बुलढाणा जिल्ह्य़ातील महिलेला मिळाले जीवनदान

नाशिक (भगवान रोकडे) दि.27 ऑक्टोबर |  महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया चे युवक प्रदेश अध्यक्ष व लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष श्री उमेश महाजन हे नेहमी सातत्याने गरजू रुग्णांना त्यांनी स्थापन केलेल्या जय बाबाजी फाऊंडेशन च्या माध्यमातून मदत करत असतात.

÷त्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पातुरडा जिल्हा बुलढाणा येथील *निर्मला बाई मधुकर गिरे* यांना कॅन्सर चा प्रॉब्लेम उदभवला व त्यासाठी तेथील डॉक्टरांनी त्यांना साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता परंतु त्यांची तेवढी परिस्थिती नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कुटुंबा समोर मोठे संकट निर्माण झाले होते.

अश्या वेळेला निर्मला गिरे यांनी एरंडोल येथील त्यांच्या जावई च्या माध्यमातून जय बाबाजी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष श्री उमेश अभिमन महाजन संपर्क साधला. तेव्हा त्यांनी शासनाच्या योजने च्या माध्यमातून फाऊंडेशन च्या मदतीने निर्मला बाई गिरे यांचे सर्व उपचार मोफत घडवून आणले. त्या वेळी दुःखात सापडलेल्या गिरे कुटुंबाच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष श्री उमेश महाजन यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button