वेळापूर येथे धम्म प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
वेळापूर/सोलापूर दि.१६ | येथील फुले शाहू आंबेडकर नगर मधील तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी धम्म प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, दरम्यान बुद्ध मुर्तीची आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी च्या जिल्हा सौ.अश्विनीताई भानवसे यांचे हस्ते करण्यात आली.
त्यानतंर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावचे उपसरपंच जावेद मुलाणी व डॉ. धनंजय म्हेत्रे यांचे हस्ते करण्यात आले,तसेच निळा ध्वजाचे ध्वजारोहण माजी उपसरपंच शंकरराव काकुळे , दिपक राऊत आणि ता.अध्यक्ष रजनिश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानतंर त्रिसरण पंचशिल बुद्ध पुजा , भिम स्मरण, भिम स्तुती घेण्यात आली.त्यानतंर सायंकाळी ८ वा.सुनिल काकासाहेब जाधव यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर व्याख्यान झाले तसेच चळवळ कशी होती कशी चालली आहे याबद्दल देखील मार्गदर्शन केले.
यावेळी जि.प.सदस्य बाळासाहेब धाईऺजे, ग्रा.पं माजी सदस्य दिपक राऊत, पी.आर.पी.आय. तालुका अध्यक्ष उमेश वाघमारे आदी समाज बांधव फुले शाहू आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते उपस्थित होते