अकलूज मध्ये नामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस साजरा
अकलूज- दि. 15 ऑक्टोंबर | महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची व कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्रच करण्यात आले होते.
अकलूज येथेही नामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अकलूजमधील प्रतापसिंह चौक व सावतामाळी मंदिर माळवाडी येथे ना. छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर कार्यकर्त्या सौ. सीमा एकतपुरे यांनी लावले होते.
वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर महिलांच्या हस्ते सावता महाराज मंदिर माळेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
जवळपास ७५ वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प समता परिषदेच्या सौ सीमाताई एकतपुरे यांनी केला. या कार्यक्रमाला आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.