माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात
माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावून मदत कोकणाकडे रवाना
*माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावून मदत कोकणाकडे रवाना*
- *नाशिक,नांदगाव, दि.१८ ऑगस्ट :-* कोकण भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोकणातील बांधव अडचणीत सापडले आहे. या बांधवांना दिलासा देण्यासाठी माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्ती, तांडे फिरून मदत गोळा केली. ही मदत आज माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवीत रवाना करण्यात आली.
कोकणातील बांधवांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीमेस पहिल्या दिवशी साकोरा जिल्हा परिषद गटातून प्रारंभ झाला. त्यानंतर मागील आठ दिवसात नायडोंगरी, जातेगाव, जिल्हा परिषद गटातून तसेच नांदगाव शहर व मनमाड शहरात मदत गोळा करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन करण्यासाठी फेरी काढली. तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थ व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद या मदतीसाठी मिळाला. या सर्व गावांमधून सुमारे १०० क्विंटल धान्य गोळा झाले.तसेच मोठ्या प्रमाणात मदत अन्य स्वरूपात जमा झाली.
सदर जमा झालेली सर्व मदत व धान्य व्यवस्थित रित्या निवडून व पॅकेजिंग करून व जीवनावश्यक वस्तूंचे किट नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तयार करण्यात आले. यामध्ये भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने जलशुद्धीकरणाच्या गोळ्या प्रत्येक किटमध्ये समाविष्ट करून सदर मदत आज पूर ग्रस्तांना पाठविण्यात आली.
यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यातील जनतेने दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल व मदतीचे हात मजबूत केल्याबद्दल तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केले.
यावेळी पदाधिकारी शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, दतु पवार, सोपान पवार, डॉ वाय. पी. जाधव. सचिन देवकाते, नांदगाव,नगरसेवक वाल्मिक टिळेकर. बबलु पाटील. रईस फारुकी, हबीब शेख, सादिक पठाण, अमित बोरसे, अजमद पठाण, राजाभाऊ जाधव, योगेश जाधव, विनोद शेलार, सूरेश गायकवाड, अशोक पाटील, भरत जाधव, मुकुंद खैरनार, सचिन जेजुरकर,महेश पवार. महेंद्र गायकवाड, राजु लाठे, राजाभाऊ सावंत, रवींद्र सुरसे, घनश्याम सुरसे, दिगंबर, सोनवणे, विश्वास आहिरे. सुधाकर निकम, दया जुन्नरे नारायण पवार,देविदास पगार. दिपक पगार, बाळासाहेब देहडराय, प्रताप गरुड उपस्थित होते.
तसेच दादा पगार, अरुण इपपर,पंडित सूर्यवंशी, सुबोध थेटे. सुशिल आंबेकर, सचिन कोरडे, भाऊसाहेब महाजन,संभाजी शिंदे, तानसेन जगताप, शिवाजी जाधव, नाना शिंदे, किसनराव जगधने, सोमनाथ पाटील, अक्षय देशमुख, मयूर सोनवणे, नितीन वाघमारे, विठ्ठल नलावडे, प्रकाश बोधक, योगेश जगताप, बाबा पठाण, अरविंद काळे, प्रथमेश सोमासे, अर्पणा देशमुख, माया झाल्टे, पंढरीनाथ गायकवाड, नरेंद्र महाजन, किशोर महाजन, गोरख जाधव, रवी राठोड, देविदास काळे, ज्ञानेश्वर देवरे, हर्षल देवरे, अमोल पाटील, गौतम दाभाडे, लक्ष्मण भसरे, नंदु वडळकर, ज्ञानेश्वर फणसे, दिपक खैरनार, सुधीर चव्हाण, रतन हलवर, महेंद्र शिसोदे, माणिक नेहमणार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..