वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी शाळांना 20,000 रुपयांची पुस्तकं भेट
जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचा उपक्रम
कळंब ता.४ | उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विलासजी जाधव व शिक्षणाधिकारी मा.श्री.मोहिरे साहेब यांच्या प्रेरणेतून जिल्ह्यातील शाळांमधुन ग्रंथालय चळवळ अधिक व्यापक स्वरूपात गतिमान करण्यासाठी लोकसहभागातून ग्रंथ खरेदी व पंधराव्या वित्त आयोगातुन ग्रामपंचायत मार्फत शाळांना कपाट पुरविण्यात येत आहे.[ads1]
समाजात सोशल मीडिया मुळे ग्रंथ वाचन संस्कृती कमी कमी होत, असतानाच शाळाशाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या आशा उपक्रमाची आवश्यकता जाणवत आहे. हि गरज ओळखून राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ उस्मानाबाद च्या वतीने जिल्हा अध्यक्ष श्री संतोष भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी, जि प प्रा शा माळकरंजा, जि प प्रा शा पाथर्डी व संत बोधले महाराज प्रा शा डिकसळ, तुळजापूर तालुक्यातील जि प प्रा शा चव्हाण वाडी या शाळांना प्रत्येकी ४७ पुस्तके जवळपास वीस हजार रुपयाची पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.
या साठी राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री सुखदेव भालेकर मराठवाडा कार्याध्यक्ष सुहास दराडे सर कळंब तालुका अध्यक्ष अशोक शिंपले सर, दैनिक प्रभात केसरीचे श्री प्रदीप यादव, मुख्याध्यापक श्री राजेन्द्र बिक्कड सर यांनी परीश्रम घेतले.
खूप खूप आभारी आहोत