कोकण विभागात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संघटन अधिक मजबूत करणार – प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची कोकण विभाग आढावा बैठक संपन्न
मुंबई, नाशिक, दि. 12 | भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोकण विभागात लवकरच जिल्हानिहाय दौरा करून बैठका घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून कोकण विभागात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले.
नुकतेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले आहे. त्यानुसार कोकण विभागाची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे कोकण विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, नवी म़ुबई अध्यक्ष किरण झोडगे, राज राजापुरकर, डॉ. राजु जाधव, अनिल नळे, डॉ.प्रकाश ढोकणे, विनोद जाधव, हेमंत पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विक्रम परमार, शब्बीर खान, शंकरराव महाजन, के.आर. चौधरी, रमन खडागळे, कैलास पोटे, राजेश पाटील, श्रीमती संतोषी मोरे, कविताताई कर्डक, मोरेश्वर कडू, हरीचंद्र पाटील, जे. के. कुदळे, सैय्यद हसन, विशाल पाटील, एकवीर चव्हाण, सुरज कोंजे, अभिराज पाटील, सतीश म्हात्रे, कृष्णा मढेकर, भाऊसाहेब लबडे, शरद कानडे, रमेश पिंगळे, संदीप शिंदे, तेजस दरडिंगे यांच्यासह कोकण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचणेनुसार गाव तिथे समता परिषद अभियान राबविण्यात येणार आहे. कोकण विभागात देखील हे अभियान प्रभावीपणे राबवून कोकणातील प्रत्येक गावात समता परिषद पोहचेल. यासाठी दौरे करून सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकारणीत सक्रीय असलेल्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात यावी. जे सक्रियपणे काम करत नसतील त्यांच्या ऐवजी नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात यावी. महिलांसाठी स्वतंत्र अशी कार्यकारिणी तयार करण्यात यावी असे सांगत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजात जनजागृती करण्यावर पदाधिकाऱ्यांनी अधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.