शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये – अजय तायडे यांची मागणी
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा
खामगाव- दि.27 | यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता . सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाला असून हरभरा, गहू, कांदा पीकाची लगबग सुरू आहे, परंतु कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम संबंधित विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक उत्पादनावर परिणाम होऊन शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
त्याकरिता शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम थांबवावे व खंडित केलेल्या पुरवठा पूर्ववत करावा अशा सूचना आपल्या स्तरावरून संबंधित विभागाला द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे कडे निवेदनाव्दारे केली आहे. या विषयावर चर्चा करतांना नानासाहेब पटोले यानी सांगितले की, सध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये या बाबत चर्चा झाली असुन थकीत विज बिल न भरता चालु विज बिल भरुन विज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश सबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे .
यावेळी आमदार राजेशजी एकडे , काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटिल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, प्रदेश सचिव धनंजय देशमुख, शांताराम पाटेखेडे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.