युवा संघटन काळाची गरज -प्रदीप सातव ; गोंधनापूर व कंझारा येथे माळी समाज युवा संघटन संदर्भात बैठक संपन्न
खामगाव- माळी समाज हा तालुक्यातील अनेक गावामध्ये विखुरलेला आहे. या गावातील युवकांनी पुढाकार घेवून गाव तेथे शाखा स्थापन कराव्यात. आजचा युवक हा उद्याचा भारत घडवू शकतो. समाजाची प्रगती करू शकतो. समाजाला न्याय देवू शकतो. त्यासाठी आपल्या रूढी परंपरा सोडून द्या, व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करून महात्मा फुलेंंचे विचार कृतीतून दाखवा. व माळी समाज युवा संघटन मोहीमेत सहभागी व्हा असे आवाहन माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीप सातव यांनी केले.
माळी सेवा मंडळ खामगाव च्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक गावागावात माळी समाज युवा संघटन करणे संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेे. या अनुषंगाने दि. 19 डिसे.2021 रोजी सायंकाळी 6:30 गोंधनापुर व नंतर रात्री 8 वा.कंझारा येथे ही युवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माळी सेवा मंडळ अध्यक्ष प्रल्हाद बगाडे, सचिव प्रदीप सातव यांच्या सह सर्व जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुटाळा खु. उपसरपंच जयेश वावगे, दत्तात्रय जावळकर, संतोष बोचरे, पंकज सातव, आकाश वानखडे, गोपाळ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रदिप सातव पुढे बोलतांना म्हणाले की, माळी समाजाने आता जुन्या चालीरिती पंरपरांना फाटा देवून शिक्षणाची कास धरावी अजुनही आपले युवक शिक्षणापासून फार दूर आहेत. त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याप्रमाणे स्वत:ला वाहून घेतले पाहीजे. माळी सेवा मंडळाचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रात परिचीत आहे. हे कार्य यापुढे फक्त संमेलनापूरते मर्यादीत न ठेवता व्यवसाय मार्गदर्शन,उद्योजक मेळावा, बेरोजगारांना नोकरी यासह विविध क्षेत्रात कार्य करणार आहे. त्यामुळे युवकांनी आता संघटीत होवून माळी समाज युवा संघटन या मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संजय गाधी निराधार योजनेच्या तालुका सदस्य पदी संतोष बोचरे यांनी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माळी समाजाचे युवा नेते योगेश हजारे, क्रांतीसूर्य न्युजचे प्रविण बोचरे, जयेश वावगे, दत्तात्रय जावळकर, पंकज सातव आदींनी माळी समाज युवा संघटन कशासाठी व का याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
गोंधनापूर येथील बैठकीला गोपाळ वेरूळकर, राजेंद्र खंडारे, रविंद्र राखोंडे, गोपाळ चरखे, सागर वावगे, प्रविण निमकर्डे, योगेश गिरे, सागर बोचरेे, गोपाळ घोगले, सागर खंडारे, विशाल वेरूळकर, क्रिष्णा निमकर्डे, वृषभ वेरूळकर, नितीन निमकर्डे, बाळु खंडारे, विजय निमकर्डे, चक्रधर खंडारे, गजानन खंडारे, विनायक खंडारे, बाळु वानखडे, दिनकर वसोकार, योगेश निमकर्डे, विशाल निमकर्डे, विलास वसोकार, गजानन खंडारे, विठ्ठल वावगे, गणेश बोचरे, राजु गिरे, मंगेश बोचरे यांनी केले होते. तर कंझारा येथील बैठकीला वैभव तायडे, शुभम तायडे, विनोद तायडे, विनोद तायडे, योगेश तायडे, प्रतिक तायडे, रोशन तायडे, पवन तायडे, विष्णू तायडे, शिवदास तायडे, महेश तायडे, निलेश तायडे, संदपि तायडे, अजय तायडे, विकास बोचरे, विनय चरखे, गोपाळ चरखे, विजय निमकर्डे, गजानन निमकर्डे आदींची उपस्थित होती.