पातोंडा येथे महात्मा फुले स्मृतीदिवस साजरा
पतोंडा, चाळीसगाव- दि.28 | दिनांक .२८ नोव्हेंबर २०२१ रविवार रोजी पातोंडा ता. चाळीसगाव येथे राज्य सत्यशोधक परिषद व अ.भा. महात्मा समता परिषद शाखा पातोंडा यांच्या वतीने संत सावता माळी मंगलकार्यल येथे संध्याकाळी ७ वा. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचा १३१ वा. स्मृती दिवस प्रतीमा पुजन करून साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष पातोंडा येथील लोकनियुक नियुक्त सरपंच बापूसो. पांडूरंग आधार माळी तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सरपंच अनिल ऊर्फ आबा पहिलवान महाजन व सच्चिदानंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
समता परिषदेचे तालुकाध्यक्ष कैलस जाधव सत्यशोधक व सत्यशोधक भगवान रोकडे यांनी तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले व महात्मा बळीराजा यांच्या विचार मांडले.
याप्रसंगी आण्णा पाटील, भोला कुमावत, राजेंद्र माळी, संतोष जगताप, विश्वास जाधव, पांडू आप्पा, साहेबराव महाजन, मधुकर आबा, दत्तात्रय देशमुख, देविदास माळी इ. उपस्थित होते. तसेच पातोंडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते
सुत्रसंचालन गोविंद वाघ यांनी केले तर आभार संत सावता दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन विलास माळी यांनी मानले.