आपला जिल्हा

महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त मांडका येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

मांडका, खामगाव- दि. 28 | महात्मा जोतिराव फुले यांच्या 131 व्या पुण्यतिथी निमित्त मांडका येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर समाजातील निवड प्राप्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

सर्वप्रथम मांडका गावातील महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ.श्याम देवकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुटाळा बु. सरपंच श्रीकांत वानखडे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला दीपक क्षीरसागर यांनी माल्यार्पण केली. शेवटी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन माला अर्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रमेश खंडारे त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी विषेश उपस्थित असणारी माळी सेवा मंडळ खामगाव चे पदाधिकारी यांनी केले. त्यानंतर प्रमुख उपस्थितांचा स्वागत कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग सचिव पदी अजय भाऊ तायडे, महाराष्ट्र माळी समाज कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्षपदी नरेंद्रजी वानखडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

यानंतर या कार्यक्रमात डॉ. श्याम देवकर, नरेंद्रजी वानखडे, अजय तायडे यांनी महात्मा फुले यांच्या विचारावर प्रकाश टाकला. “महात्मा फुले यांचे कार्य व त्यांच्या वैचारिक संपत्तीचे वाचन आपण करत तर तर्कशक्तीचा वापर करायला हवा असे प्रतिपादन डॉ. श्याम देवकर यांनी केले.” तर ‘आरक्षण म्हणजे व्यवस्थेने आम्हाला दिलेली संधी आणि या संधीचा आपण प्रत्येकाला उपयोग घ्यायला हवा असे मत नरेंद्रजी वानखडेयांनी व्यक्त केले”

क्रांतिरत्न ग्रंथाचे प्रकाशनक्रांतिरत्न या विविध लेखक असणाऱ्या ग्रंथाचे 28 नोव्हेंबर 2021ला  महात्मा फुले यांच्या 131 वा पुण्यतिथी निमित्य संपूर्ण महाराष्ट्रात 131 ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात 132 व्या ठिकाणी या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. श्याम देवकर, नरेंद्रजी वानखेडे, अजय तायडे, संतोष निलखन, प्रदीप सातव यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माळी सेवा मंडळ प्रदीप सातव, महाराष्ट्र माळी समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रजी वानखडे, आदर्श शिक्षक संतोष निलखन, सुटाळा बु. सरपंच श्रीकांत वानखडे, सुटाळा खु.उपसरपंच जयेश वावगे, साहित्यिक विचारवंत डॉ. श्याम देवकर, दीपक क्षीरसागर, पंकज सातव, गणेश खिरोडकर, विलास क्षिरसागर, सरपंच रमेश खंडारे, अनिल क्षिसागर इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी करता उल्हास क्षिरसागर, माधव खंडारे, संतोष बोचरे, अनंता खंडारे, जयराम बोचरे, ग्रामपंचायत सदस्य वैभव क्षिरसागर, प्रशांत वामन खंडारे, गोपाल अत्तरकर, प्रशांत अशोक खंडा,रे पुरुषोत्तम बोचरे, गणेश क्षिरसागर, अनंता क्षिरसागर, अमोल खंडारे, राहुल क्षिरसागर, सागर खंडारे, अजय बोचरे, शुभम खंडारे, गोपाल क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन प्रविण बोचरे व आभार प्रदर्शन संतोष बोचरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button