आपला जिल्हा

क्रांतिसूर्य न्यूज Impact: नायब सिंह सैनी यांची खामगांवात जाहीर सभा संपन्न | Nayab Singh Saini

खामगांव, जि.बुलढाणा- खामगांव विधानसभा निवडणूक संदर्भात क्रांतिसूर्य न्यूज पोर्टलने 15 नोव्हेंबर ला “माळी समाज ठरवणार खामगांवचा आमदार” अशी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमध्ये माळी समाज हा खामगांव विधानसभा मतदारसंघात कशा प्रकारे निर्णायक ठरणार यावर सविस्तर विश्लेषण केले आहे. आपण ती बातमी वाचली नसेल तर इथे क्लिक करून सविस्तर वाचा. सदर बातमीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली आहे. त्याबद्दल बऱ्याच लोकांचे रिप्लाय आलेत. बऱ्याच लोकांनी या विश्लेषणाबद्दल क्रांतिसूर्य न्यूज चे कौतुक सुद्धा केले.

सदर बातमीचा Impact चांगल्या प्रकारे दिसून येत आहे. महायुतीकडून आमदार ॲड आकाश फुंडकर हे खामगांव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी माळी समाजभूषण असणारे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Hariyana Chief Minister Nayab Singh Saini) यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. ही सभा १७ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानावर दुपारी पार पडली.

Nayab Singh saini in Khamgoan

मा. नायब सिंह सैनी हे हरियाणा (Hariyana Chief Minister) मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या नंतर महाराष्ट्रभर माळी समाजात आनंद व्यक्त करण्यात आला होता. माळी समाजाच्या प्रत्येकाच्या सोशल मीडिया वर नायब सिंह सैनी यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

Nayab singh saini holding mahatma phule photo

हरियाणा चे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी नुकतीच महात्मा फुले यांची जन्म आणि कर्म भूमी असणाऱ्या पुण्यातील ‘फुलेवाडा’ येथे भेट देऊन त्यांना नमन केलं. सध्यातरी ते माळी समाजाचे एकमेव मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या शब्दाला माळी समाजात चांगल्या प्रकारे मान प्राप्त झाला आहे.

Nayab saini visit phule wada

ह्याच सर्व गोष्टी हेरून आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या प्रचारासाठी मा. नायब सिंह सैनी यांना बोलवण्यात आले असल्याचे दिसून येते. भाजप महायुतीच्या या पाऊलामुले मतदार संघात माळी समाज ॲड. आकाश फुंडकर यांना कौल देते का ? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button