आपला जिल्हा

पारोळा येथे महात्मा फुले यांच्या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न

पारोळा जि. जळगाव – दि. 29 | राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते मोठा महादेव चौकाचा सुशोभिकरणासाठी भूमिपूजन झालेल्या २५ लक्ष रूपयाचा विकासकामाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

सविस्तर असे की, दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते मोठा महादेव चौकाचा सुशोभिकरणासाठी मंजुर २५ लक्ष रूपयाचा विकासकामाचा भव्य भुमीपुजन सोहळा संपन्न झाला होता. त्याची वचनपुर्ती आज प्रत्ययात आली. आज आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते तसेच मा. नगरसेवक सुरेश देवराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील, माळी समाज मंडळाचे अध्यक्ष रमेश महादु महाजन व अॕड.दत्तात्रय लोटु महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा महादेव चौक सुशोभिकरणासह शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, बाजार समितीचे मा.संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य विजुआण्णा महाजन, एरंडोलचे मा.नगराध्यक्ष रविआण्णा महाजन, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष अरूणआबा पाटील, मा,नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, सेवानिवृत्त तहसिलदार अरूण माळी साहेब, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, धरणगांव बाजार समिती संचालक देविदास चौधरी, पारोळा बाजार समिती मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील सर, भैय्यासाहेब पाटील,

मा.पं.स.सदस्य भिडुभाऊ जाधव, मा.नगरसेवक बापु महाजन, प्रकाश महाजन, भिमराव जावळे, धिरज महाजन, भगवान महाजन, राजु कासार, आडगांव येथील डाॕ.सुधाकर महाजन, रवंजे येथील डाॕ.नलिन महाजन, मोरफळ सरपंच नंदु महाजन, सोमनाथ महाजन गांधलीकर, आबा महाजन, रिंगणगांव सरपंच कडु महाजन, आडगांव येथील पोपटआण्णा महाजन, साहेबराव महाजन, भगवान नाना महाजन, शिरसमणी येथील धिरज महाजन, टिटवी येथील छोटु महाजन यांचेसह माळी समाज मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, समाज बांधव, माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारोळा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माळी समाज हा वसलेला आहे. स्वातंत्र्य काळापासुन शहरात एवढा मोठा समाज असतांना या समाजाचे आपण देणे लागतो या दुरदृष्टीने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले. महात्मा ज्योतीबा फुले शैक्षणिक क्रांतीचे जनक होते, त्यांनी भारतीय समाज घटनेचा कायापालट केला, भारतीय स्त्रीयांसाठी ते साक्षात स्वातंत्र्यमुर्ती होते, त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला त्यांनी समाजाला दिलेले क्रांतिकारी विचार हे मनुष्याचा मनात रोवतील व मनुष्य जीवनात क्रांती घडवण्यास मदत करतील हाच हा पुतळा उभारण्या मागचा उद्देश असल्याचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button