आपला जिल्हा

सावता सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा-

पंढरपूर – दि. 04 | सावता सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सातव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जि.प.प्रा.शाळा कदम वस्ती उंबरे पा. ता.पंढरपुर येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व वृक्षरोपण करून, शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री संत शिरोमणी सावता महाराज श्रीक्षेत्र आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या मुलीचे सतरा वे वंशज ह.भ.प. दादा महाराज वसेकर. त्यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सोलापूर सौ.भारतीताई नंदुरे, सौ.जक्कवा ताई लच्याणे सामाजिक कार्यकर्त्या मंद्रूप, जिल्हा युवा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,

जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल सोलापूर सतीश वाघमारे, तालुका अध्यक्ष ओबीसेल बार्शी प्रशांत हंचनाळ, जिल्हा संघटक शिवाजी माळी ओम पालके, जिल्हाध्यक्ष सावता सेना सोलापूर तथा महाराष्ट्र प्रदेश जन संपर्क प्रमुख तुकाराम सातव, किसन दत्तू कानगुडे, बापू कोठावळे, कृष्णदेव शिंदे, पांडुरंग माळी, अमोल पिसे, गणेश माळी, इब्राहिम मुलानी, सागर तळेकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर, बाबर सर, मिसाळ सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गवारे सर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button