महापुरुषांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन

धाराशिव दि. 31 — मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारतातील थोर महापुरुष यांच्या बद्दल जे आव मानकारक वक्तव्य केले आहे, त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयात.श्री महेंद्रकुमार कांबळे यांच्याकडे तर तहसील कार्यालयात अप्पर तहसीलदार श्री निलेश काकडे यांना आपले निवेदन सादर केले आहे.
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची अश्लील शब्दात जी मानहानी केलेली आहे तसेच,महात्मा गांधी यांच्या बद्दल जे अवमानकारक वक्तव्य केले आहे त्याबद्दल सर्व भारतीयांची मान शरमेने खाली झुकलेली आहे. थोर राष्ट्रपुरुषांच्या बद्दल असे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालायला हवा. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या भिडे प्रवृत्तीला शासनाने विहिरीत वेळीच आवरावे आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही समाजात सलोखा राहावा यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, कळंब तालुका अध्यक्ष बिभीशन हजारे, संजय माळी यांच्यासह ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, जिल्हाध्यक्ष संतोष भोजने कार्याध्यक्ष दीपक हजारे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल जाधव,सुदर्शन खुणे,शहाजी माळी, उगलमुगले साहेब,चौरे सर उपस्थित होते.