विदर्भ माळी संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले स्मृती दिन व महिला दिन संपन्न

नवी मुंबई – दि. 10 |आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून विदर्भ माळी संस्थेचा दुसरा प्रकल्प काचेची शाळा ऐरोली नवी मुंबई येथे पार पडला.
ह्या प्रसंगी शाळेतील वर्ग 1 ते 7 वी तील निवडक विद्यार्थिनींनी सावित्रीमाईच्या वेशभूषेत मी सावित्री बोलतेय ह्यावर अभिनय केला. लहान लहान मुलींनी सावित्रीच्या ओवीचे गायन केले. काही विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई आणि जोतिराव फुले ह्यांच्यावर सुंदर असे प्रबोधन दिले. सर्वच कार्यक्रम अगदी ऐकण्या व पाहण्यासारखा सुंदर झाला.
शाळेतील काहीच तुकडीतील जवळपास 125 विद्यार्थी/विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेतील शिक्षिकेने केले. ह्या प्रसंगी संस्थे तर्फे सचिव श्री धैर्यशील भोपळे ह्यांनी समयोचीत मार्गदर्शन केले .ह्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर सातव, सौ रेणुका सातव, डॉक्टर श्री प्रकाश ढोकणे, निमंत्रित सल्लागार विदर्भ माळी संस्था, संस्थेचे सन्माननीय जेष्ठ सदस्य श्री बाळकृष्ण आमले सर,
संस्थेचे उपाध्यक्ष श्री शैलेश वासनकर, सदस्य श्री रविकांत इंगळे, सौ नीलिमा भोपळे आजीवन सदस्य, तसेच संस्थेचे नियमित सदस्य श्री ज्ञानेश्वर धाडसे व सौ मोनिका धाडसे उपस्थित होते. अगदी छोटासा मन्वीश विशाल उमाळे हा सुद्धा आपल्या आजी सौ शकुंतला उमाळे सोबत उपस्थित होता
विदर्भ माळी संस्थेतर्फे शाळेस सावित्रीआई व जोतीराव फुले ह्यांचा फोटो सप्रेम भेट देण्यात आला व इयत्ता 1 ते 8 पर्यंत गेल्या वर्षभरात ज्यांनी उल्लेखनीय प्रगती केली अशा आठ सावित्रीच्या लेकिंचा पुस्तक व नोटबुक देऊन संस्थेचा मान्यवर सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.