आपला जिल्हा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकरंजा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

कळंब- दि.18 | तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे बालदिन सप्ताहानिमित्त आज शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचा बाजार भरवत बाल आनंद मेळावा साजरा केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक,आर्थिक बाबीची जाण व्हावी, समाजाचे ज्ञान मिळावे, बिन भिंतीच्या शाळेतील ज्ञान प्राप्त व्हावे, व्यवहार कुशलता कळावी, यासाठी जिल्हा परिषद शाळेने बाल सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या बाजाराचे आयोजन केले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतात पिकणारा भाजीपाला, फळे तसेच स्वतःच्या घरी बनवलेले विविध खाद्यपदार्थ वडापाव, बालुशाही, जिलेबी, डोसा, उत्तपा, आप्पे भेळ, गुडदाणी, खारमुरे, पोहे, सुशीला, पॅटीस, पाणीपुरी, चहा इत्यादी विविध वस्तू घरीहुन तयार करून आणल्या.

गावातील मोक्याच्या ठिकाणी सकाळी आठ वाजताच या चिमुकल्याच्या गजबाजाटीने त्या स्थळाला बाजाराचे स्वरूप आले. गावातील सरपंच सन्माननीय विलास आबा मोहिते, उपसरपंच शरदजी गालट, पोलीस पाटील विशाल टिंगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नरसिंग गोडसे, माजी अध्यक्ष बाळासाहेब लोमटे, प्रमोद पाटील, मनोज पाटील, सर्जेराव लोमटे, पांडुरंग मुळे यांच्यासह गावातील अबाल वृद्धांनी या बाजाराला हजेरी लावली आणि बाजारातील सर्वच पदार्थ हा हां म्हणता विक्री झाले. विद्यार्थ्यांनी आणलेला सर्व माल गावकऱ्यांनी अतिशय उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात खरेदी केला.

वस्तूंची विक्री झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व ओसांडून वाहत होता .सदर आनंद मेळावा घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष भोजने ,सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे ,श्रीमती भारती सूर्यवंशी, श्रीमती समीना बागवान यांनी गेली चार दिवस अथक परिश्रम घेऊन हा बाजार यशस्वी करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. गुंज सामाजिक संस्थेचे समन्वयक श्री अजित कांकरिया ,श्री सागर सर, श्री वाघमारे यांनीही या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारत बोलके केले आणि या आनंदात सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button