महाराष्ट्र

छगन भूजबळ व उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पैठण वरून 2 युवकांची पायी मशाल यात्रा

पैठण – दि. 14 | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पैठण येथील दोन युवक रात्री २ वाजता पैठण येथून पायी वारी करीत रवाना झाले.

सविस्तर असे की, अ भा महात्मा फुले समता परिषदेचे पैठण तालुका अध्यक्ष देविदास सोनवणे व माऊली पाटील काळे हे नादर तालुका पैठण येथून रेणुका देविचे दर्शन घेऊन रात्री दोन वाजता मुंबई कडे मशाल घेऊन पायी यात्रा करण्यासाठी प्रस्थान केले.

हे दोन शेतकरी पुत्र नादर तालुका पैठण ते थेट मुंबई असा ४०० किमीचा पायी प्रवास करीत, अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री नामदार छगनराव भुजबळ व शिवसेना अध्यक्ष तथा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

या दोन्ही नेत्यांना भेटिचे कारण अजून बाहेर आलेले नाही. परंतु भूजबळ साहेब व उद्धव साहेब यांची भेट घेतल्यावर भेटी मागचे कारण समजेल असे त्यांनी अ.भा महात्मा फुले समता परिषदेचे प्रसिद्ध प्रमुख तथा पैठण तालु्का अध्यक्ष प्रकाश दिलवाले यांच्यासी बोलताना सांगितले.

मशाल घेऊन पाईपद यात्रा सूखरूप हो असा पैठण तालुक्याच्या वतीने त्यांना सदिच्छा देण्यात आल्या. अशी माहिती समता परिषद पैठण तालुका अध्यक्ष प्रकाश दिलवाले यांची प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button