आपला जिल्हा
संत सावता महाराजांची जयंती 8 नोव्हेंबर घरोघरी साजरी करावी

खामगाव – संत सावता महाराज यांनी विज्ञाननिष्ठा जपत कर्मवादी सिद्धांत मांडला आणि कामातच देव मानला. आयुर्वेदाचे जाणकार असणारे सावता महाराज यांना असाध्य असा अनेक रोगांचे इलाज माहिती होते, त्यामुळे त्यांनी अनेक रोग्यांना रोगतून मुक्त केले.
अशा विज्ञानवादी, कर्मनिष्ट संतशिरोमणी सावता महाराजांची जयंती कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच 8 नोव्हेंबर ला येत आहे. सर्वांनी संत सावता महाराजांची जयंती आप आपल्या घरी, सावता महाराज मंदिरात साजरी करावी असे आवाहन महाराष्ट्र माळी महासंघ तर्फे कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र वानखडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.