विश्वकर्मीय सुतार समाजाचा २१ नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्यस्तरीय मेळावा – उपस्थित राहण्याचे आवाहन

शिर्डी – दि. ०७ | विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती संलग्न विश्वकर्मा क्रांती दल समाज संघटने तर्फे येत्या २१ नोव्हेंबर २०२२, सोमवारी राज्यस्तरीय विश्वकर्मीय सुतार समाज समाज चिंतन आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील समाज प्रतिनिधी, समाज संस्थांचे पदाधिकारी व समन्वय समितीचे समनव्यक यांची उपस्थिती राहणार आहे.
सुतार समाज कृषक परंपरेत महत्वाचा
अध्यात्मिक संप्रदाय व देशाच्या स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी लढ्यात बलिदानाचा समृद्ध वारसा सुतार समाजास लाभला आहे. अभिजात कला व स्वकष्ट अर्जीत परिश्रमाद्वारे समाजातील सर्व घटकांशी समायोजन करून विविध क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या सुतार समाजाचे महाराष्ट्राच्या कृषक परंपरेत मोलाचे स्थान आहे. समाजाचे प्रबोधन व सामाजिक, राजकीय प्रतिनिधित्वासह सामाजिक एकजुटीची भावना, वैचारिक प्रगती व्हावी आणि समाज विधायक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने या स्रेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सद्यःस्थितीला समाजव्यवस्थेमध्ये सुतार समाजाचे स्थान, सुतार समाजाचे स्वरूप, समाजबांधवांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध वाटा आणि व्यवस्थेतील सुतार समाजापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने, यांसारख्या विविध महत्त्वाच्या पैलूंवर उहापोह केला जाणार आहे. यातून समाजाच्या प्रगतीच्या नवनवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
एक दिवस समाजासाठी, एक दिवस भविष्यासाठी एक दिवस अस्तित्वासाठी ही त्रिसूत्री समोर ठेवून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्यभरातील सुतार समाज बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीच्या वतीने आयोजक बाळासाहेब ना.पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. सविस्तर माहिती साठी 9527780099 संपर्क साधावा.
हेही वाचा..संत सावता महाराजांची जयंती 8 नोव्हेंबर घरोघरी साजरी करावी