फुले दांपत्याच्या विचारांचे अनुकरण करत समाजकार्य करा : नानाभाऊ पटोले
शेगाव- दि. 01 | सामाजिक कार्य करत असताना बहुजन समाजाला विचारांचा भक्कम पाया देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करत समाजकार्य करा. हे करत असताना त्यांच्या विचारांशी कुठलीही तडजोड करू नका, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी केले. शेगाव येथील संत सावता नगरमधील राज्यस्तरीय परिचय संमेलन स्थळाला सदिच्छा भेटीदरम्यान समाजबांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समस्त बहुजन समाजासाठी कार्य केलेले आहे त्यामुळे त्यांचे कर्तृत्व आपण कधीच विसरू नये. तसेच अशा महापुरुषांच्या कर्तृत्वाबद्दल जर कोणी अपशब्द बोलत असेल किंवा त्यांच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करत असेल तर समाजबांधव म्हणून सर्वात प्रथम आपण त्या व्यक्तीचा आणि संस्थेचा रस्त्यावर उतरून निषेध केला पाहिजे. मग ती व्यक्ती कुठल्याही पदावर असो, ते माळी सेवा मंडळ व राज्यस्तरिय युवक युवती परिचय संम्मेलन आयोजन समिती कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतांना बोलत होते.
शेगाव येथे माळी समाज युवक युवती परिचय संम्मेलन स्थळ संत सावता नगर खामगाव रोड शेगांव येथे भेट दिली व त्याठिकाणी सुरु असलेल्या सभाग्रुहाच्या बांधकामाची पाहणी सुध्दा केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापन केली. त्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली त्यानिमीत्ताने त्यांनी सांगितलेला विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आवश्यक असल्याचे ही ते म्हणालेे. काम करीत असतांना आमच्याही काही चुका झाल्या असल्याचे मान्य करून जनतेने संधी दिल्यास पुणे येथील भिडेवाड्याचा विकास प्राधान्याने करणार असल्याचे म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्झाजी, प्रदेश काँग्रेसचे महासचिव श्यामभाऊ ऊमाळकर, सचिव सर्वश्री रामविजय बुरुंगले, धनंजय देशमख, हाजी दादुसेठ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा. आमदार राहुलभाऊ बोंद्रे, खामगाव विधानसभा काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटिल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटिल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण देशमुख, जळगाव जा. तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर जयंतराव खेळकर, दिलीप पटोकार,
माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादराव बगाडे, क्षत्रीय माळी परिषदेचे अध्यक्ष राजुभाऊ आसोलकर, माजी नगर सेवक गोपालभाऊ कलोरे, संतोषभाऊ घाटोळ, प्रा. दिनेश तायडे, बाळासाहेब बगाडे, प्रल्हादराव सातव, विजयराव वावगे, अजय तायडे, रामभाऊ बोचरे विकासराव बगाडे, प्रमोदभाऊ चिंचोळकर, महादेवराव बोचरे, प्रल्हाद माळोकार, विलास क्षिरसागर, अरविंद शिंगाडे, विनायक जुमळे, दत्ताभाऊ जावळकर, पंकज सातव, निव्रुत्ती वावगे, श्रिक्रुष्ण गायकी, संजय बगाडे, श्रीकांत वानखडेे, सुनिल वानखडे, नितीन इंगळे, बळीराम वानखडे यांचे सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .